शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: जयपूर , सोमवार, 30 मे 2016 (11:03 IST)

राहुल गांधी योग्यवेळी पक्षप्रमुख होतील

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत माजी केंद्रीयमंत्री कुमारी सेल्जा यांनी राहुल गांधी हे योग्यवेळी पक्षप्रमुख होतील, असे सांगितले आहे.
 
प्रसार माध्यमांशी बोलताना सेल्जा म्हणाल्या, जय आणि पराजय हा निवडणुकीचा एक भाग असतो. पक्षातर्फे अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात येत असून त्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुधारणा करण्यात येतील, असेही त म्हणाल्या.