मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 21 एप्रिल 2015 (11:29 IST)

राहुलच्या 'हिट भाषणा'मुळे काँग्रेसमध्ये बम-बम, स्क्रिप्ट रायटर कोण?

‘अच्छे दिन’चे आश्वासन देणार्‍या नरेंद्र मोदी सरकारने जनतेची निराशा केली आहे. मोदी सरकार उद्योगपती आणि मोठय़ा लोकांचे आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सोमवारी केली.
 
सोळाव्या लोकसभेत राहुल गांधी यांचे आज पहिलेच भाषण झाले. यावेळी राहुल गांधी यांनी आक्रमक होत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मोदी सरकारने देशाची निराशा केली आहे. मोदी सरकार शेतकर्‍यांना दुर्लक्षित करत आहे. मोदींनी शेतकर्‍यांशी थेट संवाद साधायला हवा. भारतीय जनता पक्ष बोलते एक व दुसरेच करत आहे.’
 
‘अच्छे दिन’चे आश्वासन देणार्‍या सरकारने निराशा केली आहे. शेती नुकसानीचे आकडे सरकार वेगवेगळे दाखवत आहे. आकडेवारीतील घोळ पंतप्रधानांनी स्वत: तपासावा व जनतेचे दु:ख स्वत: समजून घ्यावे. कृषी विकासात फक्त 1 टक्क्याची वाढ झाली आहे. देशाची शक्ती ती शेतकरी व कामगारांच्या हातात आहे. सरकार अच्छे दिन नसून सूटबुटांचे सरकार आहे, असे सांगून ते म्हणाले, हे केवळ उद्योगपतींचे सरकार आहे.  
 
मागील दोन दिवसांमध्ये राहुलचे बदललेले वृत्ती आणि कडक भाषण शैली नंतर काँग्रेसमध्ये देखील असे प्रश्न विचारण्यात येत आहे हे भाषण कोणी लिहिले होते.