शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2015 (11:40 IST)

लग्न मोडल्याबद्दल वराला 75 पैशांचा दंड

हरियाणातल्या फतेहबाद पंचायतीने सर्वाना चकित करून सोडणारा निर्णय दिला आहे. साखरपुड्यानंतर लग्न मोडल्याबद्दल नवरदेवाला 75 पैशांचा दंड ठोठावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वधुपक्षानेही पंचायतीच्या निर्णयाशी सहमती दर्शवली आहे.

रतिया गावात राहणार्‍या एका व्यक्तीने मुलीचं लग्न गेल्या वर्षी पंजाबमधल्या एका तरुणाशी ठरवलं. लग्न येत्या 22 एपिलला होणार होतं, मात्र दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्यामुळे लग्न मोडण्याची वेळ आली. वरपक्षाने हुंड्यात मागितलेले 2 लाख रुपये दिले होतेच, त्यात भर म्हणून गाडी मागितल्याचा आरोप वधूच्या पित्याने केला आहे.

वधुपित्याचा तक्रारीची दखल घेत गावात पंचायत भरवण्यात आली. अखेर लग्न मोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत पंचायतीने वराला 75 पैशांचा दंड ठोठावण्याचा आश्चर्यकारक निर्णय दिला.