शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

लहानग्‍यांसाठी मोबाईल हानीकारक नाही

सेल्‍युलर असोसिएशनचा दावा

मोबाईल फोनचा वापर लहान मुले व गर्भवती महिलांसाठी हानीकारक आहे, की नाही या मुदयावर आता दूरसंचार विभाग व मोबाईल कंपन्‍यांमध्‍ये जुंपली आहे.

मोबाईल कंपन्‍यांसाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर करतानाच मोबाईल गर्भवती महिला व लहान मुलांसाठी नुकसानकारक असल्‍याचे मान्‍य केल्‍याच्‍या घटनेस दोन दिवस उलटत नाहीत तोच मोबाईलचा वापर हानीकारक नसल्‍याचा खुलासा जीएसएम मोबाईल सेवा पुरविणाऱया सेल्‍युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) केला आहे.

सीओएआयने याबाबत प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे, की मोबाईलमधून होणाऱया रेडीएशनमुळे मानवी शरिरावर दुष्‍परिणाम होतात या दाव्‍यांमागे कोणतेही वैज्ञानिक तथ्‍य नसून सर्वसामान्‍यांमध्‍ये विनाकारण भीती पसरविली जात आहे.

याबाबत सीओएआयचे महासंचालक टीव्‍ही रामचंद्रन यांनी म्‍हटले आहे, की गेल्‍या 10 वर्षांपासून याबाबत अनेक संशोधक संस्‍थांकडून व सरकारी एजन्‍सीज़ कडून याबाबत संशोधन केले जात आहे. त्‍यातून धोकादायक असे काहीही निष्‍पन्‍न झालेले नाही.

इंटरनॅशनल कमीशन ऑन नॉन ऑर्गनाईजिंग रेडीएशन प्रोटेक्‍शन आणि हेल्‍थ कौन्सिलिंग ऑफ नेदरलॅंड फूड अ‍ॅण्‍ड ड्रग असोसिएशन अमेरिका या दोन संस्‍थांनी केलेल्‍या संशोधनातही मोबाईलचा वापर धोकादायक असल्‍याचे आढळून आलेले नाही. मात्र इलेक्‍ट्रीक साधनांवर मोबाईलचा परिणाम होत असल्‍याने पेसमेकर सारख्‍या वैदयकीय साधनांचा वापर करणार्‍यांनी मोबाईल फोनचा वापर न करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला आहे.