गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (17:47 IST)

राजनाथसिंह यांचे संसदमध्ये आमिर खानला उत्तर

घटनानिर्मितीमध्ये काँग्रेसचं मोलांच योगदान असून भारतीय घटनेमुळेच भारत एकसंध आहे. परंतु राज्य घटनेतल्या मूल्यांवरच घाला घालण्यात येत असल्याचा आरोप सोनिया गांधींनी लोकसभेत बोलताना केला आहे.
 
घटना कितीही चांगली असेल पण ती लागू करणारे वाईट असतिल तर घटना वाईट ठरेल, तर घटना कितीही वाईट असली परंतु ती लागू करणारे चांगले असतील तर घटना चांगली ठरेल असं आंबेडकरांनी नमूद करून ठेवलंय. - सोनिया गांधी
 
जवाहरलाल नेहरू, सरदार वल्प्रलभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद व मौलाना आझाद यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घटनानिर्मितीसाठी लाभलं आहे. - सोनिया गांधी

पोलीस दल, निमलष्करी दलांमध्ये महिलांसाठी ३५ टक्के एवढी भरती करण्याची आमची योजना असून तसे सगळ्या राज्यांना कळवण्यात आले आहे. महिला सशक्तीकरण हा आमचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे. - राजनाथ सिंह
 
घटनेमध्ये अल्पसंख्याक संस्था उभारण्याचा मार्ग मोकळा केला, परंतु त्यासाठी त्यांना सेक्युलर सेक्युलर असा घोष करावा लागला नाही - राजनाथ सिंहांचा विरोधकांना टोला
 
भारतात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती, मग तो कुठल्याही धर्माचा असेल तरी तो भारतीयच आहे अशीच आमची धारणा आहे. - राजनाथ सिंह
 
फंडामेंटर लाईट्स किंवा घटनेतील प्रत्येक व्यक्तिला दिलेले अधिकार हा भारताचा श्वास आहे, ह्रदय आहे. - राजनाथ सिंह
 
कुठलंही काम छोटं नसतं हे आम्ही स्वच्छ भारत अभियानातून दाखवलं असून अनेक उच्चपदस्थ व्यक्ती रस्त्यावर झाडू घेऊन उतरल्या आणि या कामाचंही महत्त्व जाणलं. - राजनाथ सिंह
 
सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून पंथनिरपे७ असा आहे आणि तो याच अर्थाने वापरायला हवा असा माझा आग्रह राहील. - राजनाथ सिंह
 
पारसी व ज्यू या दोन्ही समाजांना जगभरामध्ये सन्मानानं वागवणारा व धार्मिक स्वातंत्र्य देणारा देश केवळ भारत आहे. एवढंच नाही मुस्लीमांमधील सगळेच्या सगळे समाजघटक केवळ भारतात आढळतात. - राजनाथ सिंह
 
भारतामध्ये जर कुठल्या शब्दाचा वारेमाप गैरवापर होत असेल तर तो शब्द सेक्युलर हा आहे. भारताचा परीचयच पंथनिरपेक्ष असा आहे, जो बाबासाहेबांना अभिप्रेत होता. त्यामुळे त्यांना हा शब्द प्रिएंबलमध्ये वापरण्याची गरज वाटली नाही. - राजनाथ सिंह
 
सेक्युलर व सोशालिस्ट शब्द प्रिएंबलमध्ये ४२व्या घटनादुरुस्तीमध्ये जोडण्यात आले आहेत. ते आवश्यक वाटले असते तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच हे शब्द वापरले असते. - राजनाथ सिंह
 
बाबासाहेब आंबेडकर मूल भारतीय आहेत, ते कशाला देश सोडून पळतील. तुम्ही बाहेरून आला आहात, आर्यन बाहेरून आलेत असं सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा व राजनाथ सिंह यांच्यावर हल्ला चढवला.
 


घटनेमध्ये, प्रिएंबलमध्ये कुठलाही बदल करायचा नाही असं असतानाही, सेक्युलर व सोशालिस्ट हे शब्द मागाहून घालण्यात आले. यांना माझा विरोध नाही, परंतु ही बाब सगळ्यांना माहीत हवी म्हणून उल्लेख करण आवश्यक आहे. - राजनाथ सिंह
 
आरक्षण ही राजकारणाचा मुद्दा नाही, तर सामाजिक, आर्थिक समानतेसाटी बाबासाहेबांनी आरक्षण महत्त्वाचं मानलं आणि तिच्यासंदर्भात वेगळा विचार शक्य नसल्याचं आमचं मत आहे. - राजनाथ सिंह
 
अस्पृश्यतेच्या विरोधात बाबासाहेबांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं, एवढंच नाहीतर समानतेएवढं महत्त्वाचं काहीच नाही याचा पुरस्कार बाबासाहेबांनी कायम केला. त्याच उद्देशातून त्यांनी आरक्षणाचा पुरस्कार केला. - राजनाथ सिंह
 
भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या संस्था उभारण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान खूप महत्त्वाचं आहे. श्रमिक कल्याणासाठी कायदेशीर तरतुदींवर बाबासाहेबांनी काम केलं तसेच तळागाळातल्या समाजाला उपयुक्त अनेक योजनांमध्ये बाबासाहेबांच्या बुद्धीचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. - राजनाथ सिंह
 
स्वतंत्र भारतामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं योगदानही महत्त्वाचं असून ते कुणालाही नाकारता येणार नाही. - राजनाथ सिंह  
 
शेकडो संस्थानांमध्ये विभागलेल्या भारताला वल्लभभाई पटेलांनी जोडलं असेल तर घटना समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एकत्र ठेवण्याचं अजोड काम केलंय. - राजनाथ सिंह
 
अनेकवेळा उपेक्षा झाली, अपमान सहन करायला लागला परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही देश सोडून जाण्याचा विचारदेखील केला नाही, उलट भारत सशक्त करण्याचा संकल्प केला. - राजनाथ सिंह
 
भारताला मिळालेली घटना ही अनेक दिग्गजांनी दिलेल्या योगदानाचा परिणाम आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. - लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
 
संसदेचे हिवाळी अधिवेशन यशस्वी होणार. - लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनांनी व्यक्त केला विश्वास.