गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (09:31 IST)

लालूपुत्रांच्या वयाबाबत आयोगाने चौकशी करावी: भाजप

पाटणा- बिहार विधानसभेची आगामी निवडणूक लढवू इच्छिणारे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांच्या सर्वात धाकटे पुत्राने आपल्या वयाबाबत प्रतिज्ञापत्रात जी माहिती दिली आहे तिची निवडणूक आयोगाने चौकशी करावी आणि त्यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राज्य शाखेच्या अध्यक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नुकतीच एका निवेदनाद्वारे केली.
 
धाकटा पुत्र तेजस यांच्या वयाबाबत भाजप व इतर विरोधकांनी गदारोळ चालविला असतानादेखील लालूप्रसाद हे अविचल आहेत आणि तेजस याच्या मतदार कार्डावर जे वय नमूद केले आहे तेच खरे व अंतिम असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत भाजप व इतर विरोधक हे विनाकारण अकांडतांडव करीत आहेत व राज्यातील जनतेची आणि मतदारांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.
 
राघोपूर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणारे तेजस यांचे व मतदार यादीत 26 वर्षे दाखविले व तेच खरे असल्याचा ठाम दावा लालूप्रसाद यांनी राजद कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला आहे. 
 
याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी निवडणूक आयोगाने त्याबाबत योग्य ती चौकशी करून लालूप्रसाद यांच्या पुत्राच्या वयाबाबत खात्री करून घ्यावी असे आवाहन केले आहे.