शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (09:46 IST)

वजनापेक्षा जास्त बोलण्याची गडकरींना सवय: नितीशकुमार

पाटणा- नितीन गडकरी यांना वजनापेक्षा जास्त बोलण्याची सवय आहे. त्यांनी बिहारसाठी जाहीर करण्यात आलेल्या एकूण पॅकेजऐवजी त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांनी उत्तरे आधी द्यावीत, असा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावला.
 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी बिहारला सव्वा लाख कोटी रूपयांचे पॅकेज दिल्याचे म्हटले होते. याच मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी गडकरींची ट्विटरच्या माध्यमातून खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी दिलेल्या पॅकेजमध्ये सर्वाधिक वाटा हा रस्ते निर्मितीसाठी आहे. एकूण पॅकेजमधील 56 हजार कोटी रूपांच्या माध्यमातून बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यावरून नितीशकुमार यांनी गडकरींवर टीका केली. बिहारमध्ये 41 महामार्ग बांधण्यासाठी या पॅकेजमध्ये 54,713 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 47,553 कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्या सरकारच्या काळातच मंजूर करण्यात आले आहेत. केवळ 7,160 कोटी रूपयांचे रस्ते बांधणी प्रकल्पच्या पॅकेजमध्ये नव्याने अंतर्भूत करण्यात आले आहेत. याकडे नितीशकुमार यांनी लक्ष वेधले आणि गडकरींचा मुद्दा खोडून काढला.