शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

वसुंधरा राजेंना आवडली 72 लाखाची घोडी....

इंदूर- राजस्थानची मुख्यमंत्री वसुंधरा राजेंना एक घोडी पसंत पडली असून त्यांनी ही घोडी विकत घेण्याची इच्छा दर्शवली आहे. पुष्कर मेळ्यात वसुंधरा यांनी ही घोडी बघितली आणि त्यांनी ती फार आवडली.
 
या घोडीची किंमत 72 लाख रुपयांपर्यंत लागली असून हिचा मालक घोडीच्या बदल्यात दीड कोटीची मागणी करत आहे.


 
इंदूरहून आलेल्या या पद्मा नावाच्या घोडीला राजे यांनी माळ घालती आणि तिच्यावरून प्रेमाने हातदेखील फिरवला. पद्माजवळ 15 मिनिटे उभे राहून राजे यांनी तिच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. ही घोडी पांढर्‍या रंगाची आहे तसेच मला ब्राऊन रंगाची घोडी खरेदी करायला आवडेल असे ही वसुंधरा राजे यांनी म्हटले.