बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

वाघोबाचा हवाई प्रवास...!

PTIPTI
देशात पहिल्यांदाच वाघांच्या संरक्षणासाठीचे प्रयत्न गंभीरपणे घेण्यात आले असून राजस्थानातील सवाई माधोपूर येथील रणथम्‍बोर राष्ट्रीय अभयाण्यातून वायुदलाच्या हेलीकॉप्टरने शनिवारी वाघाला अल्वरच्या सरिस्का अभयारण्यात आणण्यात आले आहे.

राजस्थानचे मुख्य वन्यजीव संरक्षक आर. एन. मेहरोत्रा यांनी याबाबत सांगितले, की रणथम्‍बोर राष्ट्रीय अभयारण्यातून वाघास वायुदलाच्या हेलीकॉप्टरने सरिस्का आणण्यात आले असून हवामान अनुकूल राहिल्यास मादी वाघिणीस लवकरच रणथंम्‍बोरहून सरिस्का आणण्यात येणार आहे.

वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाघाला एका अभयारण्यातून दूस-या अभयारण्यात नेण्यासाठी हेलीकॉप्टरचा वापर केल्याची ही पहिलीच वेळ आहे. सुमारे अडीच ते तीन वर्ष वयाच्या या वाघाला घेऊन वायुदलाचे हेलीकॉप्टर पाऊण तासाच्या प्रवासाने सरीस्का येथे पोचले.

रणथम्‍बोर अभयारण्य क्षेत्रात शुक्रवार रात्रीपासूनच पाऊस सुरू असल्याने वाघीण न सापडल्याने केवळ वाघालाच सरिस्का आणण्याचा निर्णय घेण्यात आला. वाघाला बेशुद्ध करून एका पिंज-यात टाकून त्याला नेण्यात आले. यासाठी दोन्हीही अभयारण्यात हेलीपॅड निर्माण करण्यात आले होते.

भारतीय वन्य जीव प्रशिक्षण संस्था देहराडूनच्या पथकाने गेल्या सोमवारी वाघीणीस बेशुद्ध करून तिला रेडियो कॉलर लावले होते. देहरादूनच्‍या या पथकाने यापूर्वी 25 डिसेंबर 2007 रोजी दोन वाघांना रेडियो कॉलर लावले होते.