शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (12:44 IST)

वाजपेयी मागदर्शक तर अडवाणी आणि जोशी केवळ दर्शकाच्या भुमिकेत

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप)संसदीय मंडळातून पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी या भाजपच्या त्रिमूर्तींना वगळले आहे. हे तिन्ही नेते आता केवळ मार्गदर्शक भूमिका साकारणार आहेते. त्यासाठी भाजपमध्ये प्रथमच एका मार्गदर्शक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु पक्षाच्या घटनेमध्ये या मंडळाची तरतूदच नाही. संसदीय मंडळच पक्षाला मार्गदर्शन करते. असे मतप्रवाह सध्या वाहू लागले आहेत. धक्कादायक म्हणजे अडवाणींकडून एनडीएचे कार्याध्यक्षपदही काढून घेण्यात आले आहे.
 
भाजपमधील पाच सदस्यीय मार्गदर्शक मंडळात अडवाणी आणि जोशी हे केवळ दर्शकाच्या भूमिकेतच असतील. वाजपेयी आजारी असल्यामुळे सक्रिय नाहीत. अशा वेळी अडवाणी- जोशी यांनी पक्ष किंवा सरकारच्या विरोधात एखादा प्रस्ताव आणला तरीही मोदी-राजनाथ असल्यामुळे त्याला काहीच अर्थ उरणार नसल्याचे चित्र दिसत आहे. 
 
भाजपच्या 34 वर्षांच्या इतिहासात प्रथमच तिन्ही ज्येष्ठ नेत्यांना सन्मानाचे स्थान द्यावे एवढ्याचसाठी मार्गदर्शक मंडळ स्थापण्यात आले आहे. 
 
भाजपने सर्व निर्णयांची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. त्यात पाच सदस्यांची नावे आहेत. त्यात अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि राजनाथसिंह यांचा समावेश  आहे. सत्तरी गाठलेल्या नेत्यांनी आता विश्रांती घ्यावी, या संघाच्या इच्छेवर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे.
 
केंद्रीय संसदीय मंडळ पुढीलप्रमाणे...
अमित शहा, नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी,  अनंतकुमार, थावरचंद गहलोत, शिवराजसिंह चौहान, जगतप्रकाश नड्डा, रामलाल.