बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , गुरूवार, 5 मे 2016 (12:22 IST)

विजय मल्ल्यांचा राजीनामा स्वीकारला

उद्योगपती विजय मल्ल्यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहून राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

गेल्याच आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाकडून मल्ल्या यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यात आला. ईडीच्या आग्रहाखातर मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, तर मालमत्तेची पूर्ण माहिती बँकांना देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मल्ल्या यांना दिले आहेत.

विजय मल्ल्यांची राजीनामावर स्वाक्षरी नसून, त्यांनी कोणतीही कागदपत्रं जोडली नसल्याचं कारण हमीद अन्सारींनी दिलं होतं. मात्र आज अखेर विजय मल्ल्यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहून राज्यसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.