गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: पणजी , बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (11:32 IST)

विदेशी बँकेत खाते नाही; टिम्बलो यांचा बचाव

गोव्यातील खाण मालक राधा टिम्बलो यांचे नाव केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेल्या काळ्या पैसाधारकांच्या यादीमध्ये आहे. पाच देशात किंवा विदेशातील बँकेमध्ये आपले अघोषित बँकखाते नाही असा बचाव टिम्बलो यांनी येथे मंगळवारी मीडिाशी बोलताना केला आहे. 
 
आपली सद्सद्वेकबुध्दी स्वच्छ असून आपण सर्व कर भरले आहेत आणि कोणतीही थकबाकी नसल्याचे टिम्बलो यांनी सांगितले आहे. आपल्यासारख्या प्रामाणिकपणे व नियमितपणे प्राप्तिकर भरणार्‍याच्या मागे निष्कारण असा ससेमिरा लावल्याबद्दल त्यांनी खेद प्रकट केला आहे.