शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

वेबदुनिया आता मराठीत

प्रिय वाचक,

आपल्यापुढे वेबदु‍निया मराठी हे संकेतस्थळ सादर करताना खूप आनंद होत आहे. मराठी वाचक फार चोखंदळ समजला जातो. त्याच्या वेगवेगळ्या गरजा समजून घेऊन आम्ही वेबदुनिया मराठी हे संकेतस्थळ आपल्यापुढे ठेवत आहोत.

वेबदुनिया मराठी या संकेतस्थळाचा हा पहिलाच टप्पा आहे. तंत्रज्ञान बदलत जाईल, काळ बदलत जाईल तसे आपल्या संकेतस्थळातही बदल होत जातील. या संकेतस्थळावर आपल्याला महाराष्ट्रासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बातम्या, अर्थविषयक घडामोडी, ‍क्रीडा, साहित्य, पर्यटन, मनोरंजन, मराठी चित्रपट, बॉलीवूडच्या घडामोडी, आरोग्य, सौंदर्य, ज्योतिष आदी सर्व प्रकारची माहिती मिळेल.

असे सर्वसमावेशक माहिती देणारे मराठीतील बहुधा हे पहिलेच संकेतस्थळ आहे. वेबदुनिया आपल्या वाचकांसाठी नवनवीन माहिती व पोर्टलशी जोडलेल्या आधुनिक सेवा देण्यात यापुढेही कटिबध्द राहील.

वेबदुनिया हे संकेतस्थळ हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम वाचकांसाठी नवीन नाही. पण त्याजोडीला आता मराठीसह गुजराथी, पंजाबी, बंगाली कन्नड भाषेतही ते उपलब्ध होत आहे. म्हणजे वेबदुनिया आता चार ऐवजी नऊ भारतीय भाषांमध्ये आपल्यापुढे येत आहे.

वेबदुनिया मराठी हे संकेतस्थळ आपल्याला आवडेल असा आम्हाला विश्वास आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही पुरेपुर प्रयत्न करू. आपल्याला हे संकेतस्थळ कसे वाटले याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया व सूचना आपण आम्हाला जरूर कळवा. आपल्या कल्पनांचे आमच्याकडे स्वागत आहे. वेबदुनियाला अधिकाधिक वाचकाभिमुख होण्यासाठी आपला सक्रीय सहभाग आमच्यासाठी मोलाचा आहे.

आपले आशीर्वाद, सूचना व प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत.

-संपादक