गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

वैद्य‍कीय प्रवेशासाठी ‘नीट‘ यंदापासूनच

नवी दिल्ली- विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा याच शैक्षणिक वर्षापासून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
 
‘नीट’ची सक्ती रद्द करण्याचा 2013 मध्ये दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने काही दिवसापूर्वीच मागे घेतला होता आणि ‘नीट’ची वैधता नवीन खंडपीठाने तपासण्याचे आदेश दिले आहेत. ‘नीट’चे पुनरुज्जीवन झाल्याने ती केंद्रीय पातळीवर घेतली जाण्याची चिन्हे होती. फक्त ही परीक्षा कोणत्या वर्षीपासून व्हावी, याबाबत मतभेद होते.

काही खासगी संस्थाचालकांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या होत्या. पण त्या सर्व फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने यंदापासूनच वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय पातळीवर ‘नीट’ ही एकच परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.