बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (10:42 IST)

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हेडलीची साक्ष

डेव्हिड हेडलीची मुंबई न्यायालयासमोर  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवण्यास सुरूवात झाली.
२६/ ११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला हेडलीची साक्ष नोंदवण्यात येणार आहे अशी माहिती उज्वल निकम यांनी दिली.

या हल्ल्यात हात असल्याने अमेरिकेच्या न्यायालयाने हेडलीला ३५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांनी बुधवारी अमेरिकेच्या संबंधित प्रशासनाला समन्स बजावत त्याला न्यायालयात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याचा आदेश दिला होता.

मुंबईवर झालेल्या या हल्ल्याच १६६ जणांना प्राण गमवावे लागले होते, तर ३०० हून अधिक नागिरक जखमी झाले होते.