शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: देहरादून , गुरूवार, 21 एप्रिल 2016 (10:11 IST)

शक्तिमानचा अखेर मृत्यू

आंदोलनादरम्यान भाजपचे आमदार गणेश जोशींच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या शक्तिमान घोड्याचा अखेर मृत्यू झाला.
 
देहरादूनमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान जोशी यांनी पोलिसांच्या शक्तिमान घोड्यावर जोरदार लाठीहल्ला केला होता. हा लाठीहल्ला इतका भयंकर होता की, शक्तिमान घोड्याचा पाय निकामी झाला. या प्रकरणी गणेश जोशींना अटक करण्यात आली होती. शक्तिमानला वाचवण्यासाठी अमेरिकेतील तज्ञ डॉक्टरांची टीमही बोलवण्यात आली. जखमी शक्तिमान घोड्याचा पाय कापून त्या जागी कृत्रिम पाय बसवण्यात आला होता. मध्यंतरी शक्तिमाननेही उपचाराला साथ दिली होती. तो उभाही राहिला. पण, पायाला झालेल्या जखमेमुळे संसर्ग झाल्यामुळे शक्तिमानचा मृत्यू झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.