गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 सप्टेंबर 2014 (10:56 IST)

शतकवीर नरेंद्र मोदी, सोशल मीडियावर धूम

2014 सत्तेमध्ये परिवर्तन. अनेक वर्षाच्या काँग्रेस राजवटीला ‘दे धक्का’ दिला. प्रथमच सत्तेत भाजप अर्थात एनडीएचे सरकार केंद्रात विराजमान झाले. याचे श्रेय जाते ते नरेंद्र मोदी यांना. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आले. याच सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. मोदी फिव्हर सोशल मीडियातही पाहायला मिळत आहे. देशातील जनतेला एक विकासाचे स्वप्न मोदी यांनी दाखविले. ते सत्यात उतरविण्याचे शिवधनुष्य मोदी यांनी उचलले आहे. पंतप्रधान झालेल्या याच नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसागणिक मोदी यांची प्रसिद्धी वाढतच आहे. मोदींच्या 100 दिवसांच्या कालावधीत सोशल नेटवर्किगसाईटमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकच्या लाईकची संख्या अधिकच वाढलेली दिसत आहे.
 
मोदींच्या चाहत्यांची संख्या 6 मार्चला 1 कोटी 10 लाखांनी वाढली. त्यानंतर त्यांनी 1 कोटी 40 लाख करण्याचा संकल्प सोडण्यात आला. मोदींचे 2 कोटी फॉलोअर्स आहेत. यामध्ये वाढ होतच आहे. फेसबुकचे महिन्याला 1.32 बिलियन फॉलोअर्स अँक्टिव्ह आहेत. त्यातील 108 फॉलोअर्स भारतातील आहेत.
 
मोदींनी आपल्या पंतप्रधान कार्यालयाचे पेज फेसबुकवर उपलब्ध केलेय. जेणेकरुन याच्या माध्यमातून देशाला जोडण्याचा त्यांनी संकल्प जोडला आहे. फेसबुकवर 4,741,577 इतके लाईक पाहायला मिळतात. तसेच ट्विटर जनतेच्या सूचनाही मागविल्या आहेत.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापुढे मोदी गेले आहेत. 4 कोटी 20 लाखांनी मोदींनी आघाडी घेतली आहे. मोदींच्या चाहत्यांमध्ये 18-34 वयोगटातील युजर्सची संख्या जास्त आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये ही संख्या सर्वाधिक दिसून येत आहे.
 
मोदी सरकारमधील अनेक मंत्री फेसबुकच्या माध्यमातून जनतेला भेटत आहेत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, अरुण जेटली, स्मृती इराणी आदींसह अनेक मंत्री फेसबुकवर आहेत. एकूण 543 पैकी 332 खासदार हे फेसबुकवर आहेत.