शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (11:22 IST)

शनिशिंगणापूर येथील वादावर तोडगा नाही

शनिशिंगणापूर येथील मंदिरातील महिला प्रवेशाच्या वादावर आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांची शिष्टाई असफल ठरली. देवस्थान, ग्रामस्थ, भूमाता मंच त्यांच्या भूमिकांवर ठाम राहिल्याने पुण्यातील बैठकीतही तोडगा निघू शकला नाही.

बैठकीस श्री श्री रविशंकर, देवगड देवस्थानाचे प्रमुख भास्करगिरी महाराज, शनी देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर, शनिदेव बचाव कृती समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे, साईराम बानकर, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई आदी उपस्थित होते. 

तिरूपती येथील बालाजी आणि जगन्नाथ मंदिराप्रमाणे महिला आणि पुरुषांना ३ फुटांवरून दर्शन द्यावे, असा पर्याय रविशंकर यांनी सुचविला. तो देवस्थान आणि ग्रामस्थांनी मान्य केला, मात्र भूमाता ब्रिगेडने तो अमान्य केला.

रूढी परंपरा खंडित करणे खपवून घेतले जाणार नाही. चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यास विरोधच आहे. मुख्यमंत्र्यांनीही तोडगा न काढल्यास न्यायालयीन लढा देण्यात येईल, असा इशारा शनिदेव बचाव कृती समितीने दिला.