मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , मंगळवार, 2 ऑगस्ट 2016 (11:00 IST)

शशिकला राज्यसभेतच रडू कोसळलं

तमिळनाडूतील खासदार असलेल्या शशिकला पुष्पा यांनी राज्यसभेत बोलताना तमिळनाडूत आपण सुरक्षित नसून सतत आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सांगितलं. पक्ष सोडण्यासाठी आपल्यावर दबाव दिला जातो आहे. असं म्हणत त्यांना राज्यसभेतच रडू कोसळलं.
 
दिल्लीतल्या इंदिरा गांधी विमानतळावर शशिकला यांनी डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांच्या कानाखाली लगावल्या होत्या. शशिकला राज्यसभेत बोलत असतानाच तमिळनाडूत जयललिता यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांची ही कृती पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचं सांगत जयललितांनी ही कारवाई केली.