गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 22 जानेवारी 2015 (11:45 IST)

शांती भूषण म्हणाले, केजरीवाल प्रमाणे प्रामाणिक आहे किरण...

आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य शांती भूषण यांनी म्हटले आहे की दिल्लीच्या सीएम पदाच्या उमेदवार किरण बेदी कुठल्याही बाबतीत केजरीवाल यांच्यापेक्षा कमी नाही आहे.  
 
शांती भूषण यांनी बेदींची प्रशंसा करत म्हटले आहे की किरणपण अरविंद केजरीवालपेक्षा कमी प्रामाणिक नाही आहे. त्यांनी बेदी यांना  सीएम उमेदवार बनवण्यासाठी भाजपला मास्टरस्ट्रोक म्हटले आहे.  
 
शांती भूषण यांचे असे ही म्हणणे आहे की जर किरण मुख्यमंत्री बनतील तर हे दिल्लीसाठी फारच उत्तम असेल.  
 
त्यांनी म्हटले की मी किरणसोबत काम केले आहे. आणि तिची प्रतिमा एका प्रामाणिक व्यक्तीप्रमाणे आहे. भाजपने त्यांना आपल्या पक्षात सामील करून मास्टर स्ट्रोक खेळले आहे.   
 
महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांअगोदर किरण बेदी भाजपमध्ये सामील झाली होती आणि पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून घोषित केले आहे.