गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (11:51 IST)

शिक्षक दिनानिमित्त पीएम मोदी यांची क्लास...

- राजकारणात येऊन किंवा सैन्यात जाऊनच देशाची सेवा होते असे नाही, तुम्ही घरात वीज वाचवणं हीदेखील देशसेवा आहेच - मोदी
- माझा कोणीही फॅशन डिझायनर नाही - मोदी
- उर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत सूर्य आहे, २१ जून हा सर्वात मोठा दिवस असल्याने याच दिवशी योग दिवसाचा प्रस्ताव दिला - मोदी
- पालकांनी त्यांची स्वप्नं मुलांवर लादू नये, मुलांच्या आवडीनिवडी जाणून घ्यावात - मोदी
- शीना बोरा हत्याप्रकरण, पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी खार पोलिस ठाण्यात पोहोचले.
- तुम्हाला ज्याची आवड आहे त्यावर वाचन करा, त्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्या, या मुद्द्यांचा वापर भाषणात होतो - मोदी
- तुम्ही उत्तम श्रोते असाल तर तुमचा आत्मविश्वास वाढत जातो, दुसरी लोक काय बोलतील याचा विचार करु नका - मोदी
- प्रत्येकामध्ये कलागूण असतातच, मी निसर्गाशी जास्त जोडलेलो असल्याने कधी कधी कविता लिहायचो - मोदी
- माझे लक्ष वर्गापेक्षा वर्गाबाहेर जास्त होते, बहुधा त्यासाठी मी तयार झालो असीन - मोदी
- यशाला वेळेच्या बंधनात अडकवू नका, स्वतःला झोकून द्या, यश हमखास मिळणारच - मोदी
- मी अपयशी होणार नाही अशी मानसिकता तयार होणे गरजेचे - मोदी
- यशाची कोणतीही रेसिपी नसते - मोदी
- प्रत्येकाने आठवड्यातील एक तास किंवा वर्षातील १०० तास एका शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा - मोदींचे आवाहन
- आपल्याकडे चांगले शिक्षकही आहेत, शिक्षकी पेशात पुढील पिढ्या घडवण्याचे काम होते - मोदी
आपल्याला विकासाचा वेग वाढवायचा आहे, सुशासन, पारदर्शकता हवी असेल तर डिजिटल इंडियासारख्या मोहीमेची आवश्यकता - मोदी
- राजकारणात का यायचे आहे याचा आधी विचार करा, सर्वसामान्यांची दुःख जाणून घ्या - मोदी
आठवी - नववीतल्या मुली घनकचरा व्यवस्थापनावर अॅप तयार करत असतील तर भारतात स्वच्छ होईल असा माझा विश्वास आहे - मोदी
- राजकारणातील मंडळी काय खेळतात हे सर्वांनाच माहिती आहे - कोणता खेळ खेळता या प्रश्नावर मोदींचे गंमतीदार उत्तर

- राजकारणात येण्यासाठी नेतृत्वगुणांचा विकास करा, लोकांना सोबत घेऊन चला - मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला
- बुद्धिवान तसेच विविध क्षेत्रातील मंडळांनी राजकारणात सहभागी व्हायला पाहिजे - मोदी
- देशात राजकारणाविषयी गैरसमज आहेत, पण यामुळे देशाचेच नुकसान होत आहे - मोदी
- जीवन हे एका व्यक्तीमुळे बनत नाही, आपण प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे - मोदी
- माणसात संवेदना फक्त कलेमुळेच येते, कला उत्सवाच्या माध्यमातून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलेला चालना देण्याचा प्रयत्न - मोदी
- देशाला फक्त रोबोट तयार करायचे नाहीत, आपल्यात संवेदना असणे गरजेचे - मोदी
- डॉक्टरने एका रुग्णाचे प्राण वाचवले तर त्याची बातमी येते, पण असे हजारो डॉक्टर, इंजिनियर घडवणा-या शिक्षकांची कधीच बातमी येत नाही - मोदी
- डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना शिक्षक म्हणूनच ओळखले जावे असे वाटायचे - मोदी
- शिक्षक कधीच निवृत्त होत नाही - मोदी
- शिक्षकांच्या जीवनात विद्यार्थ्यांचे तर विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व हे दोघांनीही जाणून घेतले पाहिजे - मोदी
- प्रत्येक विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा प्रभाव असतो, शिक्षकाने सांगितलेल्या काही गोष्टी आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो - मोदी
- प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आई वडिल व शिक्षकांचे मोलाचे योगदान असते - मोदी
- विद्यार्थी हीच शिक्षकांची खरी ओळख - पंतप्रधान नरेंद्र मोदी