शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

शिवराज सिंह नाटकी: साध्वी प्रज्ञा सिंह

उज्जैन- मध्यप्रदेशात सुरू असलेल्या सिंहस्थ कुभंमेळ्यात पवित्र क्षिप्रा स्नानापासून रोखल्याने संतप्त झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. शिवराज हे पूर्ण नाटकी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच खरे राष्ट्रभक्त आहे, असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे.
 
उज्जैन येथे एका पत्रकार ‍परिषदेत बोलताना साध्वा म्हणाल्या, ज्या लोकांनी मला त्रास दिला त्या लोकांना याचे परिणाम भोगावे लागतील. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी नुकतीच राष्ट्रीय तपास संस्थेने साध्वी यांना क्लीनचिट दिली आहे.