शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 23 जुलै 2014 (14:07 IST)

महाराष्ट्रीयन जेवणावरून शिवसेनेच्या खासदारांचा राडा!

महाराष्ट्रीयन जेवण न वाढल्याच संतप्त शिवसेनेच्या 11 खासदारांनी आयआरसीटीसीच्या एका कर्मचार्‍याच्या तोंडात जबरदस्तीने चपाती ठोसल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित कर्मचारी मुस्लिम असून पवित्र रमजानच्या महिन्यात त्याने रोजे ठेवले होते. या घटनेवरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यातील आहे. मुस्लिम कर्मचारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील कॅटरीन सुपरवायझर आहे. घटनेनंतर आयआरसीटीसीच्या कर्मचार्‍यांनी आंदोलन करून काम बंद केले होते. तसेच महाराष्‍ट्राचे रेजिडेंट आयुक्तांना लिखित तक्रारही दिली होती.
 
या कथित घटनेमुळे आयआरटीसीचा कर्मचारी अरशत जुबैर याच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. महाराष्ट्राचे रेजिडेंट आयुक्तांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांनी अरशत जुबैर यांची भेट घेऊन त्याची माफी मागितली. दुसरीकडे, महाराष्‍ट्र सरकारदेखील याप्रकरणाची चौकशी करत आहे.
 
शिवसेनेचे खासदार म्हणाले की, त्यांना महाराष्ट्र सदनमध्ये त्यांना अपमानीत करण्‍यात आले होते. अरशत जुबैर याने केलेले आरोप शिवसेनेच्या खासदारांनी फेटाळून लावले आहे. यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळही करण्‍यात आला.