शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (09:46 IST)

शीना अमेरिकेत आहे: इंद्राणी

मुंबई- शीना वोरा हत्येप्रकरणी पोलिसांनी तब्बल आठवडाभर चौकशी करूनही इंद्राणी मुखर्जी हिने अद्याप हत्येची कबुली दिलेली नाही, माझी मुलगी शीना अमेरिकेत आहे आणि तिथे मजेत आहे, असे तिने म्हटले आहे.
 
देशभरात गाजत असलेल्या शीना वोरा हत्याकांडाची चौकशी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया स्व‍त: करत आहेत. आतापर्यंत 56 तास तिची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, माझ्या वकिलांशी सल्लामसलत करून मी बोलेन, असे ठरलेले उत्तर ती बहुतेक प्रश्नांना देत आहे.