शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 29 ऑगस्ट 2014 (18:58 IST)

शीला दीक्षित पुन्हा सक्रीय राजकारणात?

केरळच्या माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने काँग्रेसचा धुव्वा उडवला होता.मात्र आता पुन्हा दिल्लीत सत्ता मिळवून देण्यासाठी दीक्षित यांच्याकडे जबाबदारी देण्याची शक्यत आहे. शीला दीक्षित दिल्लीच्या राजकारणात परतल्या तर त्याचा पक्षाला लाभ होऊ शकतो असेही जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.


शीला दीक्षित यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याबाबत अद्याप काहीच स्पष्ट केलेले नाही, परंतु अपेक्षा अशी व्यक्त केली जात आहे की, राज्यपालपदाचा राजीनामा िदल्यानंतर त्यांच्यावर तशी कोणतीही महत्त्वाची जबाबदारी उरलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा लाभ दिल्लीत पक्षबांधणीसाठी काँग्रेसकडून करून घेतला जाऊ शकतो. राजीनामा देण्याच्या आधी गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांसोबत दीक्षित यांनी बंद खोलीत चर्चा केली होती. त्यात अनेकांनी त्यांना राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचाच सल्ला दिल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, शीला दीक्षित दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. 1998 ते 2013पर्यंत मुख्यमंत्रिपदाचा अनुभव आहे. त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवून निवडणुका जिंकणे कठीण आहे, असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी म्हटले आहे.