गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

शेतकर्‍यांना सात टक्के वजाने 17 फेब्रुवारीपासून कर्जपुरवठा

नवी दिल्ली- शेतकर्‍यांना अल्पमुदतीचे 3 लाख रुपांर्पतचे कर्ज सात टक्के वजदराने देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.
 
वेळेवर कर्जाची परफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 4 टक्के वजाने कर्ज मिळणार आहे. शेतकर्‍यांना आता नवीन निणर्यानुसार एक वर्षासाठी सात टक्के वजाने 3 लाखांपर्यत कर्ज मिळेल, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितली.
 
सरकारने बँकांसाठी चालू आर्थिक वर्षात 9 लाख कोटी रुपांचा कर्जपुरवठा कृषी क्षेत्रासाठी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गतवर्षी कृषी क्षेत्रासाठी साडेआठ लाख कोटी रुपयांचे कर्जपुरवठा उद्दिष्ट होते. वजमाफीसाठी सरकारने 2016-17 च्या बजेटमध्ये 15 हजार कोटी रुपांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे.