शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

श्रीप्रकाश जयस्वालसोबत राखी सावंतचे लग्न!

FILE
केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्च्याने अनोख्या पद्धतीने प्रदर्शन करून विरोध व्यक्त केला.

कार्यकर्त्यांनी एक मोठे पोस्टर बनवले. यामध्ये जयस्वाल उभे असून चित्रपट अभिनेत्री राखी सावंत त्यांच्या गळ्यात वरमाला घालण्याच्या तयारीत आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी जयस्वाल यांच्या पुतळ्याचे दहन केले.

FILE
शहरात महिला संघटना व विरोधी पक्षांचा रोष अद्यापही संपला असून त्यांच्याविरोधात दररोज प्रदर्शने व पुतळा दहन सुरू आहे.

येथील शिक्षक पार्क मधील भाजपा कार्यालया समोर कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरवर लिहिले होते, नवीन लग्न, नवीन मजा. कार्यकर्त्यांनी जयस्वाल यांच्याविरोधात घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळला.