शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 30 ऑगस्ट 2015 (22:05 IST)

संजीव खन्नाने दिली हत्येची कबुली

24 वर्षाच्या शीना बोरा हत्याकांडातील एक-एक करून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आलेत.. त्यानंतर आता लवकरच या नात्यांच्या अक्राळविक्राळ गुंतागुंतीचे आणि हत्येचे प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे. 
 
रायगडच्या जंगलात सापडलेले शीना बोराच्या शरीराचे अवशेष आज फॉरेन्सिक आणि डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात येत आहेत.
 
शीनाचा खून झाला त्यावेळी आपण गाडीत झोपलो होतो.. अशी पहिल्यांदा बतावणी करणार्‍या संजीव खन्नाने अखेर आपल्या कृत्याची कबुली दिली. शीनाचा गाडीतच गळा दाबून हत्या करणारा संजीव खन्नाच होता, हे यामुळे सिद्ध होते. यावेळी गाडीत ड्रायव्हर श्याम राय आणि शीनाची आई इंद्राणीदेखील होते. 
 
शिनाच्या हत्येचा सगळा प्लान इंद्राणीनेच आखला होता.. इतकेच नाही तर ज्या ठिकाणी शीनाचा मृतदेह जाळण्यात आला त्या रायगडच्या जंगलाची ‘रेकी’ही इंद्राणीने अगोदर केली होती. 
 
24 एप्रिल रोजी शीनाचा खून केल्यानंतर शीनाचा मृतदेह ज्या गाडीत होता ती गाडी स्टार टीव्हीचे माजी सीईओ आणि इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांच्या बंगल्याच्या आवारातच रात्रभर उभी होती. दुसर्‍या दिवशी शीनाचा मृतदेह रायगडच्या जंगलात नेऊन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.