शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (12:21 IST)

संथारावरील बंदी उठविली

नवी दिल्ली- राजस्थान उच्च न्यायालयाने जैन समाजातील संथारा व्रतावर घातलेली बंदी उठवित सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालय व केंद्र सरकारला नोटीस पाठविली आहे. 
 
राजस्थानच्या उच्च न्यायालयाने संथारा व्रतावर घातलेल्या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होताना न्यायालयाने बंदी उठविण्याचा निर्णय घेतला असून राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. 
 
जैन समाजामध्ये केलं जाणारा संथारा या व्रतामध्ये स्वयंप्रेरणेने मृत्यूपर्यंत उपवास करण्यात येतो. या व्रताला विश्‍व हिंदू परिषदेने समर्थन दर्शविले आहे.