गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 25 मे 2016 (12:41 IST)

सरकारचे दोन वर्ष, राजपथावर विशाल समारोहाला होस्ट करतील अमिताभ

केंद्रच्या राजग सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन 26 मे रोजी सायंकाळी येथे इंडिया गेटवर आयोजित विशाल समारोहाचे सूत्र संचलन करणार आहे.  
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधानांनी माहिती आणि प्रसरण राज्य मंत्रीसोबत एका बैठकीत समारंभाच्या संबंधित विस्तृत चर्चा केली.  
               
समारंभ सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे आणि पाच तास चालणार आहे. समारंभात लहान डॉक्युमेंट्रीच्या माध्यमाने मोदी सरकारची यशगाथा दाखवण्यात येईल. कार्यक्रमात सरकारचे थीम सांग मेरा देश बढ़ रहा है, आगे बढ़ रहा है याचे मंचन केले जाईल.  
             
समारोह दरम्यान अनुपम खेर आणि प्रसून जोशी समेत इतर बॉलीवूड कलावंत देखील आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.