मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , गुरूवार, 28 जुलै 2016 (11:14 IST)

सरकारी नोकरीतही आता 'काम करा, पगारवाढ घ्या'

सरकारी नोकरीत एकदा शिरलं की पुढे परफार्मन्सचं टेन्शन अनेकांना नसतं..कारण नियमानुसार वेतन, बढती मिळतच असते…पण आता हे चित्र बदलणार आहे. 7 व्या वेतन आयोगाचं नोटिफिकेशन काढतानाच 'काम दाखवा आणि प्रमोशन मिळवा', ही महत्वाची अट मोदी सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी ठेवली आहे. त्यामुळे सरकारी नोकरांची क्षमता अधिक वाढेल असा विश्वास सरकारला वाटत आहे.

पगारवाढ घ्या, पण त्यासाठी चांगलं कामही करुन दाखवावं लागेल. सातव्या वेतन आयोगाचं नोटिफिकेशन काढतानाच मोदी सरकारनं  देशातल्या 47 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना हा संदेश दिला आहे. त्यामुळे आता सरकारी नोकरीतही खासगीप्रमाणे  कामगिरीनुसार प्रमोशन करण्याची पद्धत रुढ होणार आहे.