गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 31 मार्च 2015 (14:48 IST)

सलमाच्या बचावासाठी चालक सरसावला

हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला वाचविण्यासाठी त्याचा चालक सरसावल्याचे दिसून येत असून याप्रकरणी सलमानने हात झटकल्यानंतर  ‘ही घटना घडली, तेव्हा मीच गाडी चालवत होतो’ असा दावा त्याचा चालक अशोक सिंगने केला आहे.
 
ही घटना घडली, तेव्हा मीच गाडी चालवत होतो़ गाडीचा टायर फुटल्याने मला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही़ त्यामुळे गाडी फुटपाथवर चढली व यात चौघांना दुखापत झाली तसेच यातील एकाचा बळी गेला़ त्यावेळी सलमान माज्या बाजुलाच बसला होता़ त्याच्या दिशेचा दरवाजा उघडत नसल्याने तो माज्या बाजूच्या दरवाज्याने गाडी बाहेर पडला, असे सिंगने सत्र न्यायाधीश डी़ डब्ल्यू़ देशपांडे यांना सांगितल्याने या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.