शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 9 डिसेंबर 2015 (10:43 IST)

सलमानचा दोन दिवसांत ‘निकाल’

हिट अँड रन केसप्रकरणी सलमान खानविरुद्ध सुरु असल्याची खटल्याच्या निकाल वाचनास उच्च न्यायालयाने सुरुवात केली असून येत्या एक-दोन दिवसांत सलमान खानच्या अपिलावर निकाल लागण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, सरकारी वकिलांनी नोंदवलेल्या साक्षी-पुराव्यांत अनेक त्रुटी राहिल्याचे उच्च न्यायालयाने निकाल वाचनावेळी निदर्शनास आणले.  

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवत, सत्र न्यायालयाने सलमानला ६ मे रोजी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात सलमानने उच्च न्यायालयात अपिल केले आहे.