शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सातव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली- केंद्रीय कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये दुरुस्तीच्या शिफारशींसाठी नेमलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींपेक्षा जास्तीची वाढ कर्मचार्‍यांच्या खिशात पडण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय मंत्रिमडळाच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारचे सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 58 लाख पेन्शनधारकांना या शिफारशींचा लाभ होणार आहे. किमान वेतन 7000 रुपयांवरुन 18,000 रुपये होईल. हायर पे बाँडमध्ये 90 हजार रुपये बेसिक पे आता 2,50,000 रुपये होईल.
 
सरकारच्या तिजोरीवर 1.02 लाख कोटी रुपये किंवा जीडीपीच्या 0.7 टक्के बोजा पडणार आहे.
 
1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणार आहेत.