बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

साधू यादव विरोधात एफआयआर

राष्ट्रीय जनता दलाचा निरोप घेत कॉग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या साधू यादव यांच्यासह कॉग्रेस अध्यक्ष अनिल शर्मांसह तीन जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक अन्वर हुसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार साधू यादव यांनी विमानतळावरून सरकारच्या परवानगी शिवाय त्याच्या गाडीवर कॉग्रेसचे झेंडे लावले आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला आहे.

जिल्हाधिकारी सुशील कुमार सिंन्हा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.