गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 1 एप्रिल 2015 (14:11 IST)

सारस्वतांची निघाली घुमालला ‘वारी’

घुमान (पंजाब) येथे होऊ घातलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून सारस्वतांनी प्रस्थान केले आहे.

आज (बुधवार) सकाळी पुणे व मुंबई येथून साहित्यिकांनी घुमानकडे प्रस्थान केले आहे. यासाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आली असून अनेकांनी खासगी वाहनेही केली आहेत. मुख्य अतिथींसाठी विमानसेवा देण्यात आली आहे.

दरम्यान घुमान येथे पंजाबी, मराठी आणि उर्दू साहित्यिकांची मांदियाळी जमणार असून ३ एप्रिल रोजी भव्य ग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ होईल. यात नांदेडची भक्त नामदेव ग्रंथदिंडी, कविवर्य नारायण सुमंत यांची कृषिदिंडी यांसह देहू, आळंदीहूनही काही दिंड्या सामील होणार आहेत. प्रसिद्ध पंजाबी कवी सुरजितसिंग पातर यांचा विशेष सहभाग असेल. संमेलनाच्या उद्घाटनास पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल उपस्थित राहतील. या कार्यक्रमात डॉ. सुधीर रसाळ यांचा सत्कार होईल.