शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 4 जानेवारी 2012 (11:54 IST)

सीबीएसईची परीक्षा १ मार्चपासून

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) 10 व 12 वीच्या परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. यापैकी 10 वीची परीक्षा 26 मार्चपर्यंत तर 12वीची 13 एप्रिलपर्यंत घेतली जाणार आहे.

मंडळाच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, 10वीची परीक्षा वर्गवारी पद्धतीनुसार होणार आहे. मात्र 12वीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच गुण पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी श्रेणी पद्धत अवलंबण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.