गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: ठाणे , मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (16:28 IST)

सेना-भाजप युतीला अखेर सुरुंग!

आरोप-प्रत्यारोप आणि मानापमान नाटकानंतर अखेर शिवसेना - भाजपाच्या युतीला सुरुंग  लागल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मुंबईत विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी नरेंद्र मोदी मुंबईत असताना या कार्यक्रमाकडे शिवसेनेने पाठ फिरवली होती. उद्धव ठाकरेंना उशीराने निमंत्रण दिल्याने शिवसेनेत नाराजी होती. तसेच खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या मुद्द्यावरुनही शिवसेना व भाजपा आमनेसामने उभे ठाकले होते. सत्तेत असूनही सेनेकडून सातत्याने भाजपावर शरसंधान साधले होते. तर युती अबाधित राखण्यासांठी भाजपाच्या नाकी नऊ आले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत युतीसाठी दोन्ही पक्षाचे नेते अनुत्सुक होते.
 
भाजपानेही यंदा जास्त जागा मागितल्याने शिवसेना नेत्यांची यासाठी तयारी नव्हती. अखेरीस दोन्ही पक्षांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.