गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , गुरूवार, 2 जुलै 2015 (10:27 IST)

सोनियांचे नाव घेऊन ललित मोदींचा ‘ट्विटबॉम्ब’

आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी वसुंधरा राजे आणि सुषमा स्वराज्य यांचे नाव घेऊन  खळबळ  उडवून दिल्यानंतर ललित मोदी यांनी ‘ट्विट’ करुन या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव घेऊन ‘ट्विटबॉम्ब’ टाकला आहे.

आयपीएल गैरव्यवहार प्रकरण सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीने मिटविण्यासाठी वरुण गांधी यांनी एका सौद्याचा प्रस्ताव मांडला होता,असा दावा  मोदी यांनी टिष्ट्वटरवरुन केला आहे. 

दरम्यान, ललित मोदींना लंडनमध्ये भेटल्याचे वरुण गांधी यांनी मान्य केले आहे. मात्र हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून फेटाळला आहे. तर कॉँग्रेसने अद्याप याबाबतीत अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही.