मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 29 जुलै 2016 (12:17 IST)

स्वतंत्रता दिवस : लाल किल्ल्यावर भाषण दरम्यान PMवर 'ड्रोन हल्ल्या'चा धोका

स्वतंत्रता दिवसाच्या मोक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबद्दल एजेंसीने धोका दर्शवला आहे. एजेंसिने सल्ला दिला आहे की यंदा बुलेटप्रुफ घेर्‍यात पीएम मोदी यांनी लाल किल्ल्याहून आपले भाषण द्यायला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्या सल्ल्यानंतर गुप्तचर एजेंसी आणि एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) पीएमच्या सुरक्षेबद्दल खास प्रबंध करण्यात आले आहेत.  
 
बुलेटप्रुफ घेरा(शिशा) लावणे फार गरजेचे आहे  
 
टाइम्स ऑफ इंडियानुसार यंदा धोका एवढा जास्त आहे की बुलेटप्रुफ घेरा(शिशा) लावणे फारच गरजेचे आहे. यासोबतच मागील दोन वेळा मोदी यांनी शेवटच्या क्षणी बुलेटप्रुफ घेरे काढण्याचे आदेश दिले होते. पण यंदा घेर्‍यासोबतच त्यांच्या आजू बाजू सुरक्षांचे प्रबंध आधीपेक्षा जास्त असतील.  
 
एवढंच नव्हे तर दहशतवादी ड्रोनचा वापर करून पीएमवर हल्ला करू शकतात.  
 
ड्रोन हल्ल्याच्या माध्यमाने सेंध लावण्याचा प्रयत्नांवर चर्चा
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार यंदा फक्त काश्मीर हिंसा किंवा वाढलेली घुसपैठच्या घटना कारण नाही आहे, बलकी एजन्सीने काही असे संवाद  इंटरसेप्ट केले आहे ज्यात पीएमच्या सुरक्षेत ड्रोन हल्ल्याच्या माध्यमाने सेंध लावण्याचा प्रयत्नांची चर्चा आहे. त्यासोबतच आयएसआयएसच्या वाढत्या धोक्याला बघून देखील सुरक्षेबद्दल खास प्रबंध करण्यात आले आहे.  
 
अलकायदा आणि आयएसआयएसबद्दल दोन इनपुट
 
त्यासोबतच केंद्रीय गुप्तचर एजन्सीने असे ही सांगितले आहे की 15 ऑगस्टच्या समारंभाच्यामध्ये दहशतवादी संगठन ‘लोन-वॉल्फ अटॅक’ (फक्त दहशतवादी हल्ला) करू शकतात. त्यासोबतच अलकायदा आणि आयएसआयएसबद्दल दोन इनपुट एजेंसीने प्रसिद्ध केले आहे. ज्यात सेना आणि पोलिस प्रतिष्ठानांवर हल्ल्याच्या तयारीची माहिती आहे.  
 
इंदिरा गांधीच्या हत्येनंतरच ही परंपरा बनली होती
 
सूत्रांनी सांगितले की इंदिरा गांधीच्या हत्येनंतरच ही परंपरा बनली होती की लाल किल्ल्यावर बुलेटप्रुफ घेर्‍यातच पंतप्रधान यांचे भाषण होईल. पण 2014मध्ये पीएम मोदी यांनी या परंपरेला तोडले होते. त्यासोबतच मागील वर्ष 2015मध्ये त्यांनी खुल्यात भाषण दिले होते. यंदा एजन्सी समोर फार मोठे आव्हान आहे.  
 
5 हजार सुरक्षाकर्मी पीएम मोदी यांच्या सुरक्षेत राहतील  
 
सूत्रांनी सांगितले की किमान 5 हजार सुरक्षाकर्मी पीएम मोदी यांच्या सुरक्षेत लागणार आहे. यात पोलिस, सेना, गुप्तचर एजन्सी आणि  एसपीजीचे कर्मी सामील राहणार आहे. त्यासोबतच लाल किल्ल्याहून एक किलोमीटरच्या क्षेत्रात सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ट्रेड कमांडोच्या हातात राहणार आहे. येथे पक्ष्यांना देखील पंख मारण्याची आझादी राहणार नाही.