शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 25 सप्टेंबर 2016 (11:17 IST)

हम नही जायेगे पाकिस्थान - राजू

प्रसिद्ध हास्य अभिनेते आणि कोंमेडीचा बादशाह राजू श्रीवास्थव यांनी पाकिस्थानला जाण्यास आणि तेथे कार्यक्रम करण्यास नकार दिला आहे.  

आपल्या देशतील जम्मू काश्मीरमधील उरी येथे झालेल्या हल्ला झाला होता. त्यामुळे राजू प्रचंड संतापला आहे. त्यामुळे त्याने आता निषेध म्हणून राजू श्रीवास्तवने पाकिस्तानमधील कार्यक्रम रद्द केला आहे. त्याने फार मार्मिक आणि समर्पक असे सागितले की विनोद ही गंमत नाही तर तो निखळ अंत:करणातून यावा लागतो, मात्र तो दडपण आणि असे काही घडले तर तो तो ओढून ताणून आणता येत नाही, त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीत कराचीमधील प्रेक्षकांना हसविणे योग्य ठरणार नाही. अशी माहिती एका वृत्त संस्थेला दिली आहे.  

सहसा क्रिकेट सामन्यांवर दिसणारे सावट आता बॉलिवूड कलाकार आणि मनोरंजन क्षेत्रामध्येही डोकावताना दिसत आहे. तर पाकिस्थानच्या चुकीमुळे भारताने सुरु केलेले चांगले संबध आता पुन्हा ताणले जाणार आहेत.