गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2015 (12:44 IST)

हिंदुत्व धर्म नव्हे जीवनशैली आहे: मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॅनेडियन पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याबरोबर एका गुरुद्वारात आणि एका मंदिरात गेले आणि म्हणाले की हिंदूवाद एक धर्म नसून एक जीवनशैली आहे. गुरुद्वारामध्ये त्यांनी प्रार्थना सभेत भाग घेतला असून त्यांना सरोपा भेट करण्यात आले.

गुरुद्वारामध्ये लोकांना संबोधित करत मोदी यांनी म्हटले की कॅनडामध्ये राहणार्‍या शीख लोकांनी आपल्या कामामुळे भारताचा सन्मान वाढविला आहे. त्यांनी गुरू नानक यांचे पाठ आणि शहीद भगत सिंह यांच्यासह भारताच्या स्वातंत्र्य संघर्षात शिखांची असलेली महत्त्वाची भूमिकेबद्दल जाणीव करून दिली.

मोदी यांनी सांगितले की कश्याप्रकारे शिखांनी देशासाठी बलिदान दिले आणि या संदर्भात त्यांनी माणुसकीसाठी काम करण्यासाठी आवहान केले. यानंतर मोदी आणि हार्पर लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शनासाठी गेले जिथे त्यांनी भारतीय लोकांचे कौतुक केले आणि हिंदू धर्म या माध्यमातून माणुसकीसाठी काम करण्याची गरज आहे असे म्हटले.

मोदींनी म्हटले की भारतात सर्वोच्च न्यायालयाने हिंदू धर्माची खूपच सुंदर व्याख्या केली आहे. उच्चतम न्यायालयाने म्हटले आहे की हिंदू धर्म नसून एक जीवनशैली आहे. मला असं वाटतं की उच्चतम न्यायालयाची व्याख्या मार्ग दर्शवते. त्यांनी म्हटले की हिंदू धर्माने वैज्ञानिक जीवन पद्धतीने वन्यजीवांसह प्रकृतिच्या फायद्यासाठी काम केले आहे. ते पुढे म्हणाले की यामुळे जीवनातील लहान-सहान समस्यांचा समाधान मिळू शकतो.

पंतप्रधान यांनी 21 जून रोजी युनायटेड नेशन्स द्वारे आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केल्या जाण्याबाबदही उल्लेख केला. त्यांनी भारतीय समुदायाला योगाबद्दल संदेश प्रसारित करण्याचा आग्रह केला.