मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 18 जून 2016 (11:40 IST)

हिंदू विरोधकांना प्रत्युत्तरसाठी सशस्त्र सेना

हिंदू विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सशस्त्र सेना कार्यरत असल्याची माहिती डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी दिली आहे. 
 
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दाभोळकर हत्येप्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी सनातन संस्थेचा सदस्य विरेंद्र तावडे याने गोवा बॉम्बस्फोटातील अरोपी सारंग अक्कोलकर याला इमेल केला होता. या इमेलमध्ये काही संधिग्द शब्दांचा वापर करण्यात आला होता. तावडेच्या मेलमध्ये १५००० जणांच्या सशस्त्र तुकडीचा उल्लेख होता. या तुकडीची स्थापना हिंदू विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सेनेचा खर्च दानधर्मातून करावा. जर गरज पडल्यास यासाठी लुटदेखील करण्याचे सांगण्यात आले होते.