मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (12:07 IST)

हे ते 8 कारणं आहे, ज्यामुळे झाला मध्यप्रदेशात ट्रेन अपघात

मध्य प्रदेशातील हरदामध्ये झालेल्या ट्रेन अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहे. हरदापासून खिड़किया स्टेशनच्या मध्ये एकाच जागेवर कामायनी एक्सप्रेस आणि जनता एक्सप्रेस एकानंतर एक अपघाताचे शिकार झाले आहे. दोन गाड्या रुळावरून घसरल्या , ज्यामुळे अपघातात 28 लोकांचा मृत्यू झाला, जेव्हाकी 100पेक्षा अधिक जखमी झाले आहे. अपघाताबद्दल बर्‍याच शक्यता समोर येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हा अपघात कशामुळे झाला -

1) मध्य प्रदेशात मागील काही दिवसांपूसन निरंतर पाऊस येत आहे. अशाच राज्याच्या सर्व नद्यांना पूर आलेला आहे. रेल्वे मंत्रालयानुसार मुसळधार पावसामुळे माचक नदीचे पाणी पुलावर आले होते व यामुळे रुळाखालील खडी वाहून गेली होती. यामुळेच डबे घसरून हा विचित्र अपघात घडला असा अशी शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रवक्ता अनिल सक्सेनाने सांगितले रेलवे ट्रेक मुसळधार पावसामुळे धंसला होता.  

2) माचक नदीवरील पुलावर हा अपघात झाला. काही लोकांचे म्हणणे आहे की पुलाची स्थिती याअगोदरही काही चांगली नव्हती आणि पाण्याच्या जोरदार वेगामुळे पुल धसला. त्यामुळेच कामायनी एक्सप्रेसचे शेवटचे डबे रुळावरून घसरले आणि त्याच वेळेस जवळच्या रुळावरून जनता एक्सप्रेसचे इंजन आणि डबे रुळावरून घसरले.  

3) अपघात मंगळवारी उशीरा रात्री 11:45च्या सुमारे झाला. रात्रीचा अंधार आणि मुसळधार पावसामुळे रुळावर पाण्याचा वेग देखील अपघाताचे कारण असू शकतात.  

4) माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी सांगितले की पुलाची स्थिती चांगली नव्हती, म्हणून त्यावरून गाडीचे त्यावरून जाणे अर्थात लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.  

5) रेल्वे बोर्डाचे चेअरमेन एके मित्तल यांचे म्हणणे आहे की अपघाताच्या आधी दोन रुळावरून गाड्या गेल्या होत्या. अशात 10 मिनिटानंतर अपघाताचे होणे हे दर्शवते की त्या वेळेस रुळावर पाण्याचा वेग फार जोरदार होता. अचानक जास्त पाणी आल्याने रूळ धसले.  

6) एके मित्तल यांनी म्हटले आहे की पुल पाण्यात बुडाला होता.  

7) अपघाता मागे एक कारण असे ही आहे की मुसळधार पावसामुळे अचानक फ्लॅश वाटर आल्याने किमान 150 मीटर ट्रॅकच्या खालून माती निघून गेली.  

8) काही विशेषज्ञांनी दिलेल्या वृत्तानुसार पाण्याच्या तीव्र वेगाने येत असलेल्या गाड्याच्या ड्रायव्हरने पुलावर पाण्याच्या वेगाला बघून अचानक ब्रेक लावला असेल, ज्यामुळे डबे रुळाखाली उतरले.