बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हैदराबाद मुक्ती दिन तेलंगणा राष्ट्रीय समितीला अमान्य

हैदराबाद- तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्रीय समितीने (टीआरएस) 17 सप्टेंबरचा हैदराबाद मुक्ती दिन अधिकृतपणे साजरा करण्यास विरोध दर्शविला आहे. भाजप या प्रश्नात विनाकारण लुडबूड करून फुटीचे राजकारण करीत असल्याचा आरोप टीआरएसने केला आहे. 
 
तेलंगणातील लोकांना हैदराबाद स्वातंत्र्यदिन मान्य नाही. आम्ही तेलंगणा राज्य भारतामध्ये विलीन झाल्याचा दिवस मान्य करतो, असे टीआरएसचे खासदार कलवकुंटला कविता यांनी म्हटले आहे. केंद्रीमंत्री व्यंकय्या नाडू यांनी गेल्या आठवडय़ात म्हटले होते की, संपूर्ण देश 15 ऑगस्ट 47 रोजी स्वातंत्र्दिन साजरा करीत असताना तत्कालीन हैदराबाद संस्थान मात्र 17 सप्टेंबर 1948 पर्यत स्वतंत्र भारतात समाविष्ट झाले नव्हते. निजामशाहीतून भारतात समाविष्ट होण्यास हैदराबाद संस्थानला तेरा महिने लागले होते. देशाच एकतेचा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा मतपेढीचे राजकारण दूर ठेवावे, असा सल्लाही नायडू यांनी दिली होता.
 
महाराष्ट्र आणि कर्नाटकात 17 सप्टेंबर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.