बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हैदराबादमध्ये आढळला पोलिओचा विषाणू

हैदाराबाद- भारतात पाच वर्षापूर्वी नाहीसा झालेला विषाणू हैदराबादमध्ये सापडला असून तेलंगण सरकराने याची गंभीर दखल घेत पोलिओ लसीकरणारसाठी डब्लयूएचओची मदत मागितली आहे. हैदराबाद शहरातील मैलामिश्रित पाण्यामध्ये विशिष्ट प्रकाराचा पोलिओचा विषाणू आढळून आला. राज्य सरकारने या पाण्याची चाचणी करण्यासाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये हा विषाणू सापडल्याचे प्रयोगशाळेने स्पष्ट केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने सरकारने संबंधित भागामध्ये पोलिओ निर्मूलनासाठी मोहीम सुरू केली.
 
तेलंगणातील अंबरपेठमधून घेण्यात आलेल्या पाण्याच्या चाचण्यांमधून पोलिओचा विषाणू सापडला. राज्य सरकारचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव राजेश्‍वर तिवारी यांनी याबद्दल माहिती दिली. 2011 मध्ये भारत संपूर्णपणे ‘पोलिओमुक्त’ घोषित करण्यात आल्यानंतर सातत्याने काही काळाने पोलिओचा विषाणू कुठे आढळतो का, याची चाचणी केली जात आहे. त्याच पद्धतीची चाचणी करण्यासाठी अंबरपेठमधून मैलामिश्रित पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी काही नमुन्यांमध्ये पोलिओचे विषाणू आढळले.
 
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारत पोलिओ मुक्तच असल्याचे जाहीर केले. हैदराबादमध्ये सापडलेला पोलिओचा विषाणू हा लसीमधील विषाणू आहे. त्यामुळे पोलिओमुक्त भारताच्या दर्जात फरक पडणार नसल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.