गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हॉक विमान सौद्यांसाठी दिले भारतीय दलालाला 82 कोटी

नवी दिल्ली- ब्रिटनमधील प्रसिद्ध कंपनी रोल्स रॉइसने एका मोठय़ा कॉन्ट्रॅक्टसाठी भारताच्या डिफेन्स एजंटला 10 मिलियन पाउंड (साधारण 82 कोटी रुपये) लाच दिली होती. हे सिक्रेट पेमेंट कंपनीने भारतीय हवाई दलातील हॉक विमानांच्या इंजिन कॉन्ट्रॅक्टच्या मदतीसाठी दिले होते. कंपनीने भारतासह जगभरातील 12 देशांमधील कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यात या दलाल किंवा एजंटची मदत घेतली होती.
 
बीबीसीच्या रिपोर्टनुसार इंडियन डिफेन्स एजंटचे (आर्म्स डिलर) नाव सुधीर चौधरी आहे. आधी दिल्लीला राहात असलेला सुधीर चौधरी आता लंडनमध्ये राहातो. त्याला भारत सरकारने ब्लॅकलिस्ट केले आहे. भारतीय अधिकारी आणि मंर्त्यांना या ब्लॅक लिस्ट लोकांसह कंपनीसोबत करार करताना सावधगिरी बाळगण्यास सांगितलेले आहे. अनेक संरक्षणविषयक करारांमध्ये सुधीर चौधरीचे नाव आले होते, त्याची सीबीआय आणि ईडीने चौकशी देखील केलेली आहे.
 
माध्यम अहवालानुसार सुधीर चौधरीच्या वकीलाने म्हटले होते की त्याच्या क्लायंटने भारत सरकारच्या अधिकार्‍यांना कधीही लाच दिलेली नाही. एवढेच नाही तर डिफेन्स डिलमध्येही बेकायदीशीर पद्धतीने दलालीचे काम केलेले नाही. लाचेचा आरोप असलेला चौधरी आणि त्याचा मुलगा भानु यांना अटक करुन चौकशीही करण्यात आली होती, मात्र त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा इन्कार केला होता.