गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 13 फेब्रुवारी 2016 (11:02 IST)

होय, मोदींना अडकविण्याचा कट होता!

गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकविण्याचा युपीए सरकारच कट होता, अशी कबुली इंचेलिजन्स ब्युरोचे माजी विशेष संचालक राजिंदर कुमार यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
 
युपीए सरकारपुढे आव्हान म्हणून उभ्या ठाकलेल्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी इशरत जहाँ प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला' असा खळबळजनक आरोप राजिंदर कुमार यांनी केला आहे. खोटी साक्ष देण्यासाठी युपीए सरकारनं माज्यावर दबाव टाकला होता, मला बड्या नोकरीची आमिषं दाखवण्यात आली होती, परंतु त्याला मी बधलो नाही असा खळबळजनक आरोप कुमार यांनी केला आहे.