शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

‘आप’च्या दोन आमदारांना अटक

नवी दिल्ली- एका महिलेला दुष्कर्म व हत्येची धमकी दिल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार अमानातुल्लाह खान यांना दिल्ली पोलिसांनी रविवारी अटक केली. तर रात्री उशिरा पंजाब पोलिसांनी ‘आप’चे आमदार नरेश यादव यांना एका गुन्ह्याबद्दल अटक केली आहे. 
 
दिल्लीच्या काही भागांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असलने तक्रार करण्यासाठी ‘आप’ची एक माजी महिला सदस्य खान यांच्या घरी गेली होती. बराच वेळ थांबूनही प्रतिसाद न मिळाल्याने ही महिला माघारी ङ्खिरली. त्याचवेळी खान यांचा कार्यकर्ता बाहेर आला आणि तिला धमकावले. जास्त नेतेगिरी करतेस काय? तुझा बलात्कार करून जाळून टाकेन, अशी धमकी त्यानं दिल्याचा तिचा आरोप आहे. या प्रकरणी तिने जामियानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खान यांच्या आदेशावरून कार्यकर्त्याने हे गैरवर्तन केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.