शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

‘नमो चाय’ला आता ‘राहुल दुधा’ची टक्कर

WD
गोरखपूर - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसजन नवनव्या कल्पना लढवत आहेत. मोदी यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘चाय पे चर्चा’ या अभियानाला उत्तर देण्यासाठी आता काँग्रेसच्या नेत्यांनी ‘राहुल दूध’ अभियान सुरू केले आहे. ‘राहुल दूध’ पाजून तरुणांना सशक्त बनविण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

आयुष्याच्या सुरुवातीला मोदी यांनी रेल्वेगाडय़ांमध्ये चहा विकण्याचे काम केले होते. हा संदर्भ देऊन विरोधकांनी त्यांना हिणवण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसचे वाचाळ नेते मणिशंकर अय्यर यांनी तर संसद भवनात मोदींना ‘टी स्टॉल’ सुरू करून देण्याची तयारी दाखवली होती.